महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या,नातेवाइकांचा ऱ्हदय पिळवटून टाकणारा आक्रोश

Ahmednagarlive24
Published:

कोल्हापूर : महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बाराईमाम, मंगळवार पेठ येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. जिया झाकीर पटेल (वय १८) असे तिचे नाव आहे. बारावी वाणिज्य शाखेत जिया शिकत होती.

वडील मोलमजुरीचे काम करतात, तर आई घरकाम करते. दिवाळी सुटी असल्याने जिया घरीच होती. वडील शुक्रवारी सकाळी कामावर गेले. आई आणि ती दोघीच घरी होत्या. लहान भाऊ बाहेर खेळायला गेला होता. दुपारी आई कामात होती. यावेळी जियाने दुसऱ्या मजल्यावरील तुळीस गळफास घेतला.

मोठा आवाज झाल्याने आईने वर जाऊन पाहिले तेव्हा जियाने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. दोरी तोडून बेशुद्ध पडलेल्या जियाला सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीने आत्महत्या केल्याचे पाहून नातेवाइकांनी केलेला आक्रोश ऱ्हदय पिळवटून टाकणारा होता. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment