माढा :- स्वत:च्या दोन मुले आणि एका मुलीस भजी आणि थम्स अप मधून विष खायला घालून पित्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दोन मुलांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, मुलीची प्रकृती काही प्रमाणात सुधारत आहे. ही घटना बेंबळे (ता. माढा) येथे गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी घडली.
रवींद्र प्रभाकर लोखंडे (वय ३५, रा. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे) हा आपली मुलगी अनुष्का (वय ११), मुलगा अजिंक्य (वय ९), अविष (वय ६) यांना घेऊन बेंबळे येथे साडू (बायकोच्या बहिणीचा नवरा) हरी नारायण कांबळे यांच्याकडे गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आला होता.
परंतु हरी कांबळे व त्यांचे कुटुंबीय इतरत्र मजुरीसाठी गेले होते, म्हणून रवींद्र लोखंडे याने आपल्या तिन्ही मुलांसह उजनी डावा कालव्याच्या ५१ कि.मी. हद्दीत असलेल्या साईड पट्टीवर एका जंगली झाडाच्या सावलीत बसले.

याठिकाणी त्याने अनुष्का, अजिंक्य व अविष या तिन्ही लेकरांना भजी खाऊ घातले व थम्स अप पाजले. भजी व थम्स अप हे रवींद्र याने येताना बरोबरच आणले होते. यामध्ये विष घालून त्याने मुलांना खाऊ घातले व पाजले आणि नंतर स्वत: तेथील जंगली झाडास गळफास घेतला.
- 1 लाख डाउन पेमेंटवर मारुती स्विफ्ट घ्या; 5 आणि 7 वर्षांच्या EMI पर्यायांची सविस्तर माहिती
- Vivo X200T भारतात लॉन्च; 150MP कॅमेरा, 6200mAh बॅटरी आणि दमदार ऑफर्ससह प्रीमियम स्मार्टफोन
- भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू; बारामती विमानतळावर दुर्घटना, राज्यात शोककळा
- भुसावळ-इगतपुरी मेमू सेवेचा थेट कसारापर्यंत विस्तार; उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची जोरदार मागणी
- मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांवर सरकारची मोठी कारवाई; थेट आदेशाने खळबळ, पुढे काय?













