साडीच्या सहाय्याने गळफास घेवून युवकाची आत्महत्या !

Published on -

म्हसरूळ : येथील युवकाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. सनी गौतम पगारे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

तो आई-वडिलांसोबत म्हसरूळ येथे राहत होता. वडील गौतम पगारे हे एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प येथे काम करतात. पुढील दोन महिन्यांनंतर सनी हा त्यांच्या जागी नोकरीस लागणार होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe