राहुरी : नगर-मनमाड राज्यमार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या मार्गावरून प्रवास करणे अवघड झाले आहे. प्रशासन खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास तयार नसल्याने राहुरी फॅक्टरी येथील तरुणांनी एकत्रित येऊन ‘खड्ड्यांचे मोजमाप करा व बक्षीस मिळवा’ हे आंदोलन सुरू केले आहे.
नगर-मनमाड राज्यमार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होऊन अनेक जण जखमी अन् मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. शासनाचे डोळे उघडावे यासाठी राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन दि. २६ ऑक्टोबर रोजी दिवाळी सणाचा कालावधी असतानाही खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.
परंतु, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची तसदी शासनाने घेतली नाही. त्यामुळे राहुरी फॅक्टरी येथील युवकांनी ‘लढा नगर-मनमाड रस्त्यासाठी’ हा व्हॉट्स ॲप ग्रुप बनवून जिल्ह्यातील अनेक तरुणांना यात समाविष्ट करून नागरिकांसाठी खड्ड्यांचे मोजमाप करा व बक्षीस मिळवा ही योजना सुरू केली आहे.
यासाठी १ हजार, ७००, ५०० रुपये अशी बक्षिसे ठेऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे छायाचित्र अथवा लांबी-रुंदीत मोजमाप करून ठिकाण आदी माहितीसह व्हॉट्स ॲप क्रमांकावर दि. ५ नोव्हेंबरपर्यंत मागितले असून, स्पर्धेचे बक्षीस वितरण ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे.
- Tata Punch Flex Fuel : पेट्रोल, डिझेल विसरा ! आता SUV चालवा स्वस्त इथेनॉलवर…
- Wipro Share ने गाठला 3 वर्षांचा उच्चांक – गुंतवणूकदार मालामाल होणार ?
- HDFC चा शेअर 2000 पर्यंत जाणार ? मोतीलाल ओसवालने सांगितले पुढचं टार्गेट…
- मोतीलाल ओसवाल कडून मोठा खुलासा ! झोमॅटो शेअर खरेदी करावा कि नाही ?
- Samsung Galaxy S25 Ultra बद्दल सर्व काही ! पहा फीचर्स आणि किंमत…