अहमदनगर : शहरातील लालटाकी भागातील भारस्कर कॉलनीत किरकोळ वादातून वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. ही घटना एप्रिलमध्ये घडली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपी करण नारायण दिनकर (वय २०, रा. कसबा पेठ, पाथर्डी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डीतून ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १० एप्रिल २०१९ रोजी दुपारच्या सुमारास लालटाकी भागातील भारस्कर कॉलनीत किरकोळ वादातून वृद्ध महिलेची हत्या झाली होती. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना फरार आरोपी करण दिनकर हा पाथर्डीत राहत्या घरी आला असल्याची गोपनिय माहिती पो. नि. दिलीप पवार यांना मिळाली होती.
त्याआधारे पवार यांच्या सूचनेवरून सहाय्यक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोना. सचिन आडबल, रविंद्र कर्डिले, प्रकाश वाघ, रणजित जाधव, जालिंदर माने, दीपक शिंदे आदींच्या पथकाने पाथर्डीत सापळा रचून आरोपी करण दिनकर याला ताब्यात घेतले.
- एप्रिल महिन्यात होणार नगर येथील नवीन विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन!
- भारतातील सर्वात स्वस्त 7 Seater Car ! आता घरी न्या फक्त 6 लाखांमध्ये
- 6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड
- दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार
- सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद