शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : शिवसेनेची पुन्हा सत्ता येणारच आहे. तेव्हा शेतकऱ्याचा सातबारा संपूर्ण कोरा करण्यात येईल. गरीबांना १० रुपयांत जेवण देण्यात येईल. सुदृढ महाराष्ट्रासाठी १ रुपयात आवश्यक आरोग्य चाचण्या करण्यात येतील.

३०० युनिटपर्यंत घरगुती वीज वापरासाठी ३० टक्के सूट, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

राममंदिरासाठी आवश्यकता भासल्यास कायदा करा, या मागणीसोबतच बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलण्यासोबतच देशात समान नागरी कायदा लागू करा, अशा मागण्या करताना शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही त्यांनी दर्शवले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment