निवडून आणण्यापेक्षा पाडण्यात मजा असते – खा.डॉ सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

कर्जत :- भाजप उमेदवार पाडण्याचे पाप मला करायचे नाही. आपली ताकद या वेळी दाखवून देऊ, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. तथापि, खासदार सुजय विखे यांनी मध्यस्थी करत आपला मान ठेवण्याची जबाबदारी घेतल्यामुळे आपण भाजपत काम करणार आहोत, असे महासंग्रामचे संस्थापक नामदेव राऊत यांनी सांगितले.

महासंग्राम युवा मंचाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ. विखे उपस्थित होते. कुणाला पाडता आलं पाहिजे, कुणाला निवडून आणता आलं पाहिजे. निवडून आणण्यापेक्षा पाडण्यात मजा असते, असे सूचक विधानही विखे यांनी केले.

खासदार डॉ. विखे म्हणाले, राऊत यांच्या संकल्प मेळाव्याची चर्चा दूरवर गेली होती. मुख्यमंत्र्यांनाही राऊत यांचे काम माहीत आहे. यातच तुमचा विजय आहे. पालकमंत्र्याकडून कदाचित चुका झाल्या असतील. आपणही कधी कधी आक्षेप घेतला.

आपण त्याची माफी मागतो. मागील निवडणुकीप्रमाणे यावेळेसही राऊत आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपचेच काम करत उमेदवार निवडून आणावा.

गुरुवारी नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आपण खास शब्द घेतला असून विधानसभेनंतर वर्ष-दीड वर्षात राऊत हे राज्यात ओबीसींचे नेतृत्व करतील, असे आश्वासित केले. कार्यकर्त्यांचा योग्य होईल, असा शब्द विखे यांनी दिला.

४० वर्षे याच लोकांनी आपल्या भागाला पाणी दिले नाही. आज ते पाणी देण्याचे सांगतात. लोकसभेच्या वेळीच पाण्याची जबाबदारी मी आपल्या खांद्यावर घेतली. त्यासाठी दुसऱ्याकडे जाण्याची गरज नाही, असा टोला खासदार डॉ. विखे यांनी पवार यांचे नाव न घेता लगावला.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment