अहमदनगर :- जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडासाफ झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतंय.
पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
जनतेच्या मनात कायम संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असल्याने ही मागणी केल्याचं थोरात यांनी सांगितलं. सर्व्हेतून दिले जाणारे अंदाज कल्पनेच्या पलीकडचे आहेत, मात्र खरी वस्तूस्थिती वेगळी आहे.
- श्रीरामपूरचे भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणविसांची भेट घेत मागितला न्याय
- पैठणच्या नाथसागर धरणाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन, आठवणींना उजाळा देतांना झाले भावूक
- श्रीरामपूर न्यायालयात वकिलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाज बंद, आरोपीविरोधात ठोस कारवाईची मागणी
- राहुरी तालुक्यात जमीनीच्या वादातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, सात आरोपींविरोधात ॲट्रोसिटी व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- कर्जत तालुक्यातील खडी क्रेशरमुळे शेती, जनावरे आणि आरोग्यावर परिणाम, क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी नागरिकांचे तहसिलदारांना निवेदन