…तर कोणत्याही पक्षाकडून आपण निवडणूक लढवू – काकडे

Published on -

निंबेनांदूर : तालुक्यातील नवीन नेतृत्व देण्याची हर्षदा काकडे यांची तयारी आहे. परंतु तुमची साथ हवी असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख ॲड शिवाजीराव काकडे यांनी शहरटाकळी येथे केले.

काल शहर टाकळी येथे जनशक्ती विकास आघाडी जनसंपर्क दौरा वेळी दहिगाव गणाची बैठक शहरटाकळी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण गोरे हे होते.

यावेळी आबासाहेब राऊत, रामनाथ पिसोटे, सूर्यकांत गवळी, डॉ.गोरे, राजेंद्र इथापे, शेषराव आपशेटे, अशोक दातीर, मच्छद्रिं टेकाळे, देवराव दारकुंडे, कुमार फसले, विष्णू दिवटे ,भारत भालेराव, मच्छद्रिं आर्ले, भागचंद माळवदे ,

ज्ञानदेव खराडे, मनोज घोंगडे, शिवाजीराव शेळके, सदाशिव जाधव, विकास गवळी ,भास्कर ठोंबळ, नवनाथ फासाटे इत्यादी प्रमुख उपस्थित होते. यावेळी ॲड. काकडे म्हणाले की दोन-तीन घरातच अदलून बदलून तालुक्याची सत्ता आहे.

सत्तेचा उपयोग यांनी कधीच जनतेच्या विकासासाठी केलेला नाही, फक्त स्वत:चा विकास यांनी साधला तालुक्यातील कोणतेही भरीव असे काम यांचे नाही त्यामुळे जनतेने आता यांना ओळखलं पाहिजे. तुमची खंबीर साथ असल्यास कोणत्याही पक्षाकडून आपण निवडणूक लढवू असेही काकडे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe