अहमदनगर :- ज्येष्ठ नेते शरद पवार सोमवारी (२५ मार्च) सायंकाळी नगरला मुक्कामी येत आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही त्यांच्यासमेवत असतील. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष करतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जो आत्मविश्वास उंचावला आहे, तो खरा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे वळसे म्हणाले. समन्वय समितीची बैठक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समन्वय समितीची बैठक होईल. आघाडीच्या विरोधी उमेदवारां बरोबर जर कोणी फिरत असेल, तर निदर्शनास आणून देऊ. त्यावर संबंधित पक्ष कारवाई करेल. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीतील प्रत्येकी तीन जणांचा समन्वय समितीमध्ये समावेश असेल, असे काकडेंनी सांगितले. |
