अहमदनगर :- नगर दक्षिणेतून सुजय विखे यांनी अडीच लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयाकडे वाटचाल करत आहेत.
सुजय विखे यांनी हा विजय त्यांचे आजोबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना अर्पण केला.

नगर आणि शिर्डीतील निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात विखे पाटलांची ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी या निवडणुका लढविण्यापेक्षा तु खासदारकीची निवडणूक लढव, खासदार झाल्यावर देशाच्या निर्णय प्रक्रियेच्या सभागृहात सहभागी होता येते.
त्यामुळे जनतेची मोठी कामे करता येतील, असा सल्ला लोकनेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी आपणास दिला होता.
म्हणून आपण डायरेक्ट लोकसभेची निवडणूक लढवत असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी निवडणुकीत सांगितले होते. स्व. खासदार साहेबांचा हा सल्ला तंतोतंत खरा ठरला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













