राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे नगर मध्ये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी (२३ ऑगस्ट) नगरला येत असून, येथील व्यापारी-व्यावसायिकांसह वकिलांशी संवाद साधणार आहेत.

याशिवाय नगर शहरातील पक्ष पदाधिकाऱी व नेत्यांशी चर्चा तसेच फिरोदिया वृद्धाश्रम भेट व सायंकाळी पारनेरचे युवा नेते नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा समारोप त्यांच्या उपस्थितीत होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुळे यांचा राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा सुरू केला आहे.

या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात २३ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत नगरसह सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात जाऊन समाजातील विविध घटकांशी त्या संवाद साधणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment