नगर : गेली ३0 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जात आहे. आजही ते नियमितपणे सुरु आहे. या लोक दरबाराच्या माध्यमातून माझ्याशी जनतेचे नाते जुळले आहे. लोक दरबारामध्ये वैयक्तिक प्रश्नांपासून शासनाचे विविध प्रश्न मांडण्याचे काम जनतेने केले आहे.
ते सोडविण्याचे काम मी आजही प्रामाणिकपणे पार पाडत आहे. जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास मी कामाच्या माध्यमातून सोडवित आहे. आज देशावर आलेले कोरोना संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी लॉकडाऊन ३ मे पर्यंत जाहीर करण्यात आले आहे.
सामान्य जनतेच्या सोबत प्रसंगात मी नेहमीच सोबत राहून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचा रोजगार बुडाला, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत मी माझ्याकडून होईल तितकी मदत राहुरी तालुक्यातील ६८ गावांतील गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वितरणास सुरुवात केली,
असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावतीने देशामध्ये लॉकडाऊन ३ मे पर्यंत जाहीर करण्यात आले आहे. हे लॉकडाऊन लक्षात घेऊन गरजूवंतांना सुमारे चार हजार कुटुंबांना घरपोच किराणा देण्यास सुरुवात झाली. यावेळी अक्षय कर्डिले, अमोल धाडगे, सोमनाथ वामन उपस्थित होते.
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की, माझ्या वडिलांनी कामाच्या माध्यमातून जनतेशी एक जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे. त्यामुळे जनतेवर आलेल्या संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर राहणे आमचे कर्तव्य समजतो. कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन काळातही वाढ करण्यात आली.
या विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही वाढत असल्याने हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या गावात मोठ्या प्रमाणात आहे. शेतीतील कामे बंद असल्यामुळे हातावर कामगार करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये व कोणीही घराबाहेर पडू नये, शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये,या पार्श्वभूमीवर आम्ही स्वखर्चाने राहुरी तालुक्यातील ६८ गावातील गरजवंत नागरिकांना घरपोच किराणा मालाचे वाटप करण्यास सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले.