श्रीगोंदे | काष्टी येथील मतदान केंद्र २८० मध्ये बळजबरीने घुसून मतदान कंट्रोल मशीनची पूजा करून त्याचा फोटो काढल्याची तक्रार केंद्राध्यक्ष सीताराम नाना घोडके यांनी दिल्यानंतर भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांची पत्नी प्रतिभा पाचपुतेंसह अन्य चार महिलां विरोधात मंगळवारी पहाटे श्रीगोंदे पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिभा बबन पाचपुते व इतर अनोळखी चार महिला (सर्व राहणार काष्टी) यांनी २१ ला सकाळी सात वाजता मतदान सुरू होण्याच्या वेळेला मतदान केंद्रात येऊन मशीनची पूजा केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
- नगर जिल्ह्यासाठी नव्या बसेस द्या ! खा.नीलेश लंके यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना साकडे
- पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याआधी ही बातमी वाचा ! नाहीतर घराचं स्वप्न राहील अपूर्ण…
- iQOO Neo 10R लाँच होण्याआधीच लीक ! 6400mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग आणि दमदार कॅमेरासह येणार
- Tata Motors शेअर्समध्ये सतत घसरण, Motilal Oswal यांनी सांगितलं कारण
- EPFO Interest Rate : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, ठेवींवर मिळणार इतके व्याज