इव्हीएममध्ये घोळ असल्याची गडाख समर्थकांची तक्रार

Ahmednagarlive24
Published:

कुकाणे :- नेवासे बुद्रूक व साईनाथनगर येथे मतदान यंत्रात घोळ झाल्याची तक्रार गडाख समर्थकांनी केली आहे.

मतदान यंत्रातील सात नंबरचे बटण दाबल्यावर एक नंबरचा दिवा लागत असल्याचे मतदारांनी सांगितले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार घेतली नाही, असे बाळासाहेब कोकणे यांनी सांगितले, तर याबाबत तक्रार दिली नसल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.

मतदानाच्या दिवशी सकाळी सातपासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.

नेवासे बुद्रूक, साईनाथनगर व अन्य काही ठिकाणी मतदानयंत्रांत घोळ असल्याचे अनेकांनी अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणले.

नंतर क्रांतिकारी पक्षाच्या गडाख समर्थकांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

कोकणे म्हणाले, नेवासे तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी मतदान झाले.

दुपारनंतर मतदान करताना क्रांशेपचे शंकरराव गडाख यांच्या चिन्हासमोरील बटण दाबल्यानंतर भाजपच्या कमळ चिन्हासमोरील लाल दिवा लागत होता.

तहसीलदार आल्यानंतर आम्ही त्यांना यासंदर्भातील सर्व पुरावे दाखवत तक्रार दाखल करण्याची विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला.

ईव्हीएममधील घोटाळ्यामुळे निकालावर परिणाम झाला, तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कोकणे यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment