मीरा भाईंदर : प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भाईंदर परिसरात उघडकीस आली आहे. 28 वर्षीय आरोपीने 22 वर्षीय तरुणीची दुकानात गळा चिरुन हत्या केली.
भाईंदर पूर्व भागातील तलाव रोड जवळ बाळकृष्ण लीला बिल्डिंगमधील दुकानात हा प्रकार घडला. महालक्ष्मी डेअरी या आपल्या भावाच्या दुकानावर आरोपी कुंदन आचार्य दुपारच्या सुमारास बसला होता. त्यावेळी त्याची प्रेयसी अंकिता रावल भाजी खरेदी करण्यासाठी खाली आली होती.

कुंदनने तिला दुकानात बोलावलं आणि शटर बंद केलं. दोघांमध्ये काही कारणावरुन बाचाबाची झाली. त्यानंतर कुंदनने चाकू काढून अंकिताच्या गळ्यावर सपासप वार केले. यामध्ये अंकिताचा जागीच मृत्यू झाला.
अंकिताच्या हत्येनंतर त्याने स्वतःचा गळा आणि मानेवर वार करुन आत्महत्या करण्याच प्रयत्न केला मात्र वेदना असह्य झाल्यामुळे तो दुकानाचं शटर उघडून बाहेर पडला, तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात होता.आजूबाजूच्या लोकांनी त्याला रुग्णवाहिकेने मीरारोडमधील लाईफ लाईन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. कुंदनवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
- खाते रिकामे असतानाही UPI पेमेंट शक्य! UPI च्या नव्या फीचरमुळे युजर्सना काय होणार फायदा?
- शासनाचा दणका! ६८ हजार रेशन कार्डधारकांचा लाभ बंद, तुमचं नाव यादीत आहे का?
- नवीन आधार अॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य
- आयुष्मान भारत योजनेत वर्षभरात किती वेळा घेता येतात उपचार? जाणून घ्या सविस्तर नियम
- FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ! १ फेब्रुवारी २०२६ पासून कार FASTag वर KYV पडताळणी रद्द













