साईनगर शिर्डी येथून रेल्वेने १ हजार १०४ कामगार कुटुंबियांसह बिहारकडे रवाना

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी, दि.22: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील बिहार राज्यातील 1 हजार 104 कामगार व त्यांचे कुटुंबिय आज साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले.

यामध्ये  राहाता व पिंप्री निर्मळ येथे शिक्षण घेणाऱ्या 86 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या कामगारांचा स्वगृही परतण्याचा खर्च राज्य शासनाने केला असून रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ एकूण 7 लाख 72 हजार 920 एवढे भाडे अदा केले.

रोजगारानिमित्त हे सर्व जण या तालुक्यांत वास्तव्यास होते. साईनगर शिर्डी येथून शुक्रवारी पहाटे ही रेल्वे मार्गस्थ झाली. प्रशासनातर्फे सोडण्यात आलेली ही पाचवी श्रमिक रेल्वे असून परप्रांतीय कामगारांना बिहारकडे नेणारी पहिलीच रेल्वे होती.

शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे,

संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम, कोपरगांवचे तहसीलदार योगेश चंद्रे, श्रीरामपूरचे प्रशांत पाटील, रेल्वेस्थानक व्यवस्थापक बी.एस.प्रसाद, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतिश दिघे, कोपरगांव नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,

शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरिक्षक नितीन गोकावे, दीपक गंधाले, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे रामजी मीना यावेळी उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून संबधित कामगारांना तालुक्याच्या ठिकाणाहून शिर्डी रेल्वेस्थानक येथे आणण्यात आले होते.

????????????????????????????????????

लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु असल्याने राज्याच्या विविध भागात अन्य राज्यातून आलेले कामगार, नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते.

या सर्वांना विहित प्रक्रिया राबवूव त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबधित तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना प्राधिकृत केले होते.

यासंबधीची विहित प्रक्रिया राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोरपगांव तहसील कार्यालयाने अन्य कार्यालयांच्या सहकार्याने पूर्ण केली.

सर्व प्रवाशांना यावेळी साई संस्थान प्रशासनाच्यावतीने भोजनाचे पॅकेटस, पाणी, मास्क पुरविण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्टेशनवर पुरेशा औषधांसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने संबधितांची आरोग्यविषयक तपासणी केली.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन या सर्वांची रेल्वे डब्यात बसायची व्यवस्था करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे शिर्डी व परिसरात अडकून पडलेल्या 5 हजार 731 कामगारांना यापूर्वीच त्यांच्या मूळ गावी रेल्वेने पाठविण्यात आले आहे.

स्वगृही परत जाण्याचा आनंद सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. लॉकडाऊन असतानाही कामगारांना मूळ गावी परतण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या तालुका प्रशासनाला आणि रेल्वे प्रवासाचे भाडे अदा करणाऱ्या राज्य शासनाला कामगारांनी मनापासून धन्यवाद दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment