अहमदनगर :- राज्याची शिखर बँक मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केल्याने बँक अडचणीत सापडली.
त्य़ामुळे यातील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होती.
त्यावर निकाल देताना संबंधितांविरुद्ध पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे २००५ ते २०१० या काळात या बँकेवर संचालक असलेल्यांवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे.
यामध्ये नगर जिल्ह्यातील माजी आमदार यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे व चंद्रशेखर घुले यांचीही नावे असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.
नगर जिल्ह्यातील तीन नावांपैकी काहीजण राज्य साखर संघाचे प्रतिनिधी व काही जिल्हा सहकारी बँकेचे प्रतिनिधी म्हणून राज्य सहकारी बँकेवर या काळात प्रतिनिधित्व करीत होते, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.
- नगर जिल्ह्यात आहे असे एक गाव जिथे प्लॅस्टिकच्या कपात चहा मिळणार नाही !
- Big Breaking ! श्रीगोंद्यात शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जमीन विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- 8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?
- 8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ
- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ