राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्णांना घरी सोडले

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि.२४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार ८६२ नमुन्यांपैकी ३ लाख १२ हजार ६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५० हजार २३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १६३५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३९, पुण्यात ६,  सोलापुरात ६, औरंगाबाद शहरात ४,लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे  शहरात १ मृत्यू झाले आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३४  पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३०  रुग्ण आहेत तर २७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील :(कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३०,५४२ (९८८)

ठाणे: ४२० (४)

ठाणे मनपा: २५९० (३६)

नवी मुंबई मनपा: २००७ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ८८९ (७)

उल्हासनगर मनपा: १८९ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८६ (३)

मीरा भाईंदर मनपा: ४६४ (५)

पालघर:११४  (३)

वसई विरार मनपा: ५६२ (१५)

रायगड: ४१२ (५)

पनवेल मनपा: ३३० (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३८,५८५ (१११०)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: ११० (२)

मालेगाव मनपा: ७११ (४४)

अहमदनगर: ५३ (५)

अहमदनगर मनपा: २०

धुळे: २३ (३)

धुळे मनपा: ९५ (६)

जळगाव: २९४ (३६)

जळगाव मनपा: ११७ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५७० (१०३)

पुणे: ३४० (५)

पुणे मनपा: ५०७५ (२५१)

पिंपरी चिंचवड मनपा: २६७ (७)

सोलापूर: २४ (२)

सोलापूर मनपा:५२२ (३२)

सातारा: २७९ (५)

पुणे मंडळ एकूण: ६५६२ (३०९)

कोल्हापूर:२३६ (१)

कोल्हापूर मनपा: २३

सांगली: ६९

सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १५५ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ५०४ (५)

औरंगाबाद:२३

औरंगाबाद मनपा: १२३३ (४६)

जालना: ५६

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १४४६ (४७)

लातूर: ६७ (३)

लातूर मनपा: ४

उस्मानाबाद: ३१

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (५)

लातूर मंडळ एकूण: २२६ (८)

अकोला: ३६ (२)

अकोला मनपा: ३६६ (१५)

अमरावती: १३ (२)

अमरावती मनपा:  १५५ (१२)

यवतमाळ: ११५

बुलढाणा:४० (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:७३३ (३४)

नागपूर: ७

नागपूर मनपा: ४६४ (७)

वर्धा: ४ (१)

भंडारा: १०

गोंदिया: ३९

चंद्रपूर:  १०

चंद्रपूर मनपा: ९

गडचिरोली: १३

नागपूर मंडळ एकूण:  ५५६ (८)

इतर राज्ये: ४९ (११)

एकूण:  ५० हजार २३१  (१६३५)

(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २६९ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ९७ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.

ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.

प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

राज्यात सध्या २२८३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार ९१३ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६६.६०  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment