अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असतानाच सावेडीत माजी महापौर अभिषेक कमळकर यांच्या स्टेजवर सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला यांची झलक नगरकरांना पहायला मिळाली.
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या श्रीयोग प्रतिष्ठानने सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला हिला बोलावून रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली.

10,000 हून अधिक तरुण यावेळी उपस्थित होते, दरम्यान रेकॉर्ड ब्रेक गर्दी खेचून आपणही आगामी काळात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा इशारा यावेळी कळमकर दिला आहे.

कमळकर यांनी सावेडीत शक्तीप्रदर्शन करत आमदारकीचा ‘अभिषेक’च केल्याची चर्चा सध्या शहरात आहे.
गोविंदा रे गोपाळा’, ‘गो गो गोविंदा’ अशा विविध गाण्यांवर थिरकणारी तरुणाई… ढोल-ताशांचा गजर… दहीहंडी फोडण्यासाठी घोषणा ..
आणि सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला यांची एक झलक मोबाइलमध्ये टिपण्यासाठी चाललेली लगबग…अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
नगर शहरात कळमकर यांनी नगर- मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टीन परिसरात दहीहंडी उत्सव साजरा केला. या उत्सवाला अभिनेत्री उर्वशी रौतेला हिरा बोलावून गर्दीचा उच्चांक केला.
हजारो युवक खेचण्यात कळमकर यशस्वी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही ही कळमकर यांचा उल्लेख भावी आमदार असाच केला.
- पैशांचा अक्षरश: पाऊस पडेल, वास्तुशास्त्रात सांगितलेले ‘हे’ उपाय एकदा करून तर बघा!
- जगातील सर्वात महाग मांस मिळतं ‘या’ देशात, किंमत ऐकून थक्क व्हाल! भारतातही वाढलीये याची जबरदस्त मागणी
- हिमाचल प्रदेश विनाशाच्या दारात?, 100 वर्षांत इतका धोकादायक बदल झाला की…, सत्य ऐकून थरकाप उडेल!
- 70% मुस्लिम समुदाय असूनही ‘या’ देशात हिजाब-बुरख्यावर बंदी, महिलांनी नियम तोडल्यास मिळते शिक्षा!
- DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकार किती पगार देते? आकडा ऐकून थक्क व्हाल!