अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचा पावणेतीन लाख मतांनी पराभव केला.

दक्षिण लोकसभा निवडणुकीत 19 उमेदवार खासदारकीच्या रिंगणात उतरले होते. तर शिर्डी लोकसभा मतदार संघात 20 उमेदवारांनी नशिब अजमावले होते.


या दोन्ही मतदार संघात 39 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी 35 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून नगर दक्षिणचे 17 तर शिर्डीचे 18 उमेदवारांचा समावेश आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी 25 हजार अनामत रक्कम उमेदवारांकडून घेण्यात आली होती. तर शिर्डी लोकसभा मतदार संघ आरक्षित असल्याने 12 हजार 500 रुपये प्रत्येक उमेदवारांकडून निवडणूक आयोगाने जमा करून घेतली होती.
या उमेदवारांना एकूण मतदानाच्या षष्टाअंश मते मिळविणे गरजेचे होते. परंतु दोन्ही मतदार संघाचे चार उमेदवार सोडात बाकी सर्व उमेदवारांची अनामत जप्त करण्यात आली आहे.
नगर लोकसभा मतदार संघात उमेदवार नामदेव वाकळे, कळीराम पोपळघट, धीरज बाताडे, फारूक शेखे, सुधाकर आव्हाड, संजय सावंत, आप्पासाहेब पालवे, कमल सांवत, दत्तात्रय वाघमोडे,
भास्कर पाटोळे, रामनाथ गोल्हार, आबीद शेख, साईनाथ घोरपडे, नरहरी सुपेकर, संजीव भोर, संदीप सकट, श्रीधर दरेकर यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.
शिर्डी मतदार संघातील उमेदवार बंन्सी सातपुते, सुरेश जगधने, अशोक जाधव, प्रकाश आहेर, विजय घाटे, संजय सुखदान, गोविंद अमोलीक, अशोक वाकचौरे, किशोर रोकडे, गणपत मोरे,
प्रदीप सरोदे, बापू रंधीर, शंकर बोरगे, भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, सचिन गवांदे, सुभाष त्रिभूवन, संपत समिंदर यांची जमानत रक्कम जप्त करण्यात आली आहे.
- जिल्ह्यातील तीन युवकांनी मोटारसायकलवर केली प्रयागराजची यात्रा
- ‘या’ कंपनीकडून 1 शेअरवर 2 बोनस शेअर दिले जाणार! रेकॉर्ड डेट पण ठरली
- Stock To Buy | ‘हा’ स्टॉक 13720 रुपयांवर जाण्याची शक्यता ! आयसीआयसीआय सिक्युरिटीजने दिला स्टॉक खरेदीचा सल्ला
- SBI लाईफची शेअर होल्डर्ससाठी मोठी घोषणा ! गुंतवणूकदारांना ‘इतका’ Dividend मिळणार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे रेकॉर्ड डेट
- 15 चा ‘हा’ स्टॉक पोहचला 11,800 रुपयांवर ! 1 लाखाची गुंतवणूक बनली 7.87 कोटींची