अहमदनगर :- मागील पाच वर्षाचे विकासात्मक कार्य पाहून जनतेने संग्राम जगताप यांच्याबाजूने कौल दिला आहे. विकास विरुध्द निष्क्रीय माजी आमदारामध्ये ही लढत होती. यामध्ये विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला असल्याची भावना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली.
अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकितील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसर्यांदा विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल व या विजयाचे शिल्पकार ठरलेले आमदार अरुण जगताप यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, सुमतीलाल कोठारी, उध्दव शिंदे, अन्वर शेख, फईम जहागीरदार, गणेश वामन, अतुल पुरुषोत्तम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे प्रा.विधाते म्हणाले की, संग्राम जगताप यांच्या विजयासाठी सर्व समाजातील जनतेने मतदान केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनाचे हे यश आहे.
तर आमदार संग्राम जगताप यांनी शहराचा विकासात्मक आराखडा तयार केलेला असून, विकासासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे. विरोधकांचा मुद्दा नागरिकांनी खोडून टाकला आहे. पुढील पाच वर्षात झपाट्याने विकासात्मक कार्य होणार असून, नगरकरांच्या अपेक्षा ते पुर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- NSDL Share: NSDL चा शेअर खरेदी करावा का? काय म्हणतात तज्ञ? दिली पुढील टार्गेट प्राईस
- Multibagger Stock: 5 वर्षात ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना दिला 8957.80% चा परतावा! आता BUY करावा का?
- Penny Stock: काही पेनी स्टॉकने दिले 500% पर्यंत रिटर्न! पेनी स्टॉकमधील गुंतवणूक फायद्याची राहील का? काय म्हणतात तज्ञ?
- IPO 2025: लवकरच येत आहे 2025 मधील सर्वात मोठा IPO?… गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार! आली फायद्याची अपडेट
- Financial Planning: तुमचे वय वर्ष 40 आहे? तर असे करा आर्थिक प्लॅनिंग… हातात राहील पैसा