पुणे विभागात कोरोना बाधित १२०० रुग्ण – विभागीय आयुक्त

Ahmednagarlive24
Published:

पुणे दि.25 :- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 939 आहे.

विभागात कोरोनाबाधित एकूण  77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 42 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 1200  बाधित रुग्ण असून  77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात  1094  बाधित रुग्ण असून 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात  26 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात  42 बाधित रुग्ण असून  3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 28  बाधित रुग्ण असून  1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात 10 बाधित रुग्ण आहेत.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 13 हजार 693 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी  13  हजार 70 चा अहवाल प्राप्त आहे. 623 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

प्राप्त अहवालांपैकी 11 हजार  812 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 1  हजार 200 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 51 लाख 36 हजार 845 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 98 लाख 14 हजार 639 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1067  व्यक्तींना  अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment