नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून भाजपा-शिवसेना युतीत झालेल्या मतभेदांचा कल्याण-उल्हासनगर पाठोपाठ नाशकातही भडका उडाला.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे यांच्याविरोधात शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विलास शिंदे यांना बळ देण्यासाठी सेनेचे ३६ नगरसेवक व दोन्ही महानगरप्रमुखांसह ३५० पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठीच आपला लढा असल्याचा निर्धार राजीनामा देणारे सेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी व्यक्त केला असून, केवळ युतीचा धर्म पाळण्यासाठी शिवसैनिकांवर करावी लागणारी कारवाई पक्षप्रमुखांना यातनादायक ठरू नये, यासाठीच सर्व नगरसेवक व पदाधिकारी स्वत:हून पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.
लोकसभेचे यश विधानसभेतही गाठण्यासाठी भाजपा-शिवसेनेने पुन्हा एकदा युती केली असली, तरी युतीचा धागा उभय पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मनभेदाची दरी कमी करू शकलेला नाही. युतीच्या जागावाटपावरून राज्यभरात उभय पक्षांचे स् थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव निर्माण झाला आहे.
यातून उद्भवलेल्या बंडखोरीतून नाशिक जिल्हादेखील वाचू शकलेला नाही. नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी ९ विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, तर सहा विधानसभा मतदारसंघांत भाजपा उमेदवारी करीत आहे.
- नागरिकांनो सावधान! मुंबंईत पुन्हा एकदा कोरोनाची एंट्री! डॉक्टर म्हणतात…
- सिबिल स्कोअरमुळे बँक नाकारत आहेत शेतकऱ्यांचे पीक कर्ज, बँकेवर FIR दाखल करण्याच्या फडणवीसांच्या आदेशाला मात्र केराची टोपली
- तब्बल 30 वर्षानंतर तयार होणार शुभ योग ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत लाभ
- भंडारदऱ्यातील निकृष्ट रस्त्यांचा काजवा महोत्सवाला फटका, निकृष्ट रस्त्यामुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगार धोक्यात
- ‘ही’ आहेत मुंबईतील टॉप 5 इंजीनियरिंग कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे तुमचं करिअर सेट