नगर – काबाडकष्ट करणाऱ्या, स्वतःसाठी न जगणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माऊली साठी त्यांचे प्रश्न व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माऊली संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रत्येकाच्या घराघरांमध्ये पोहोचलो आहे. याचे सर्व श्रेय तुमचे आहे, चांगला विचार करायचं, हसत-खेळत जीवन जगायचं, आदेश भाऊजींनी जसा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, असा विश्वास होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनी माऊली मेळाव्या मध्ये केले.

सुमारे दोन तास हा माऊली संवाद पार पडला. दिल्लीगेट येथील पटांगणामध्ये माऊली संवाद आयोजन करण्यात आले होते, यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवा सेनेचे संपर्कप्रमुख रुपेश पाटील,
महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख अश्विनी मते, शहर प्रमुख दिलीप सातपुते, यांच्यासह नगरसेवक तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबळकर, युवासेनेचे युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड यांच्यासह नगरसेवक नगरसेविका, युवासेना, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
माऊली संवादाचा हा चौथा टप्पा सुरू झालेला आहे. माऊली संवादांमध्ये प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. यामध्ये ज्योती गोयल, संध्या सातारकर, विद्या सैंदाणे, गौरी भुसा, ज्योती मुसळे, स्वाती लगड आदींनी प्रश्न विचारले.
- महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार Diwali Bonus ! ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, खात्यात किती पैसे जमा होणार?
- Share Market मध्ये 6 महिन्यात पैसे डबल ! ‘या’ कंपनीत गुंतवणूक करणारे शेअरहोल्डर्स झालेत मालामाल, वाचा सविस्तर
- Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार 61 हजार रुपयांचा डिस्काउंट ! सेल संपण्याआधी खरेदी करा
- Tata च्या ‘या’ शेअर्सने 30 दिवसात गुंतवणूकदारांना बनवले मालामाल! मिळालेत 60% रिटर्न, आता Stock Split ची मोठी घोषणा
- ऑक्टोबरमध्ये लाँच होणार Vivo कंपनीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन !