शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत आ.राजळेंसाठी जनादेशा मागितला.
त्यामुळे आ. राजळेंना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पक्षांतर्गत इच्छुकांची फिल्डिंग मात्र चांगलीच जोर धरत आहे. त्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केदारेश्वरचे अध्यक्ष ऍड. प्रतापराव ढाकणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने राष्ट्रवादीचे नेते व पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांना पक्षाने डावलले की त्यांनी माघार घेतली याबाबतची घुलेंची भूमिका गुलदस्त्यात आहे. त्या
मुळे घुले समर्थकांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या सैरभैर झाले आहेत. निवडणुकीत भाऊंचा धक्का ही परिचित असणारी पद्धत यंदा राहणार की नाही या संभ्रमात मतदारसंघ आहे.
कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेले शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्याचे भगवेकरण कधी झाले हे कळले नाही. शेवगावपेक्षा पाथर्डी तालुक्यावर बऱ्यापैकी मुंडेंचे वर्चस्व आहे. त्याचा फायदा आ. राजळेंना सन 2014 च्या निवडणुकीत झाला.
एकास एक लढत झाल्याने घुलेंना पराभवाला समोरे जावे लागले. यंदाही एकास एक लढत होणार असेल काही उपयोग होणार नाही. त्यामुळे घुलेंनी निवडणुकीतून माघार घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ढाकणे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.
परंतु ढाकणेंना घुले मदत करणार का असा प्रश्न उपस्थित होते आहे. ढाकणे यांनी कोणाच्या बळावर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. शेवगाव तालुक्यात आजही घुलेंचे वर्चस्व आहे.
येथील नगरपालिका सोडली तर सर्वच सहकारी संस्था घुलेंच्या ताब्यात आहे. त्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे घुलेंच्या पाठीशी आहे. असे असतांनाही घुलेंनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट न करता गुंतागुंत वाढविण्याची रणनिती आखली आहे. त्यामुळे घुले समर्थक अस्वस्थ आहेत.
- महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार Diwali Bonus ! ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, खात्यात किती पैसे जमा होणार?
- Share Market मध्ये 6 महिन्यात पैसे डबल ! ‘या’ कंपनीत गुंतवणूक करणारे शेअरहोल्डर्स झालेत मालामाल, वाचा सविस्तर
- Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार 61 हजार रुपयांचा डिस्काउंट ! सेल संपण्याआधी खरेदी करा
- Tata च्या ‘या’ शेअर्सने 30 दिवसात गुंतवणूकदारांना बनवले मालामाल! मिळालेत 60% रिटर्न, आता Stock Split ची मोठी घोषणा
- ऑक्टोबरमध्ये लाँच होणार Vivo कंपनीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन !