नेवासा तालुक्यात माजी खा. तुकाराम गडाख मनसेकडून लढणार ?

Ahmednagarlive24
Published:

सोनई :- भाजप आता खुप मोठा झाला असून त्या पक्षाला कुणाची फारशी गरज राहीलेली नाही. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरल्याने आता मला बोलावे लागणार आहे.

मी कोणत्याही पक्षाचा बांधील नाही, एक माणूस देखील बदल घडवू शकतो, अशी मला खात्री असल्याने वेळप्रसंगी मी सोनईत राज ठाकरेची सभा लावू शकतो, अशा शब्दात माजी खा. तुकाराम गडाख यांनी मनसेकडून लढण्याचेच अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.

गडाख म्हणाले, नेवासा तालुक्यात सामान्य माणसाच्या प्रश्नावर कुणीच बोलत नाही सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. रोजगारीचे प्रमाण १८ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत.

शिक्षणाचे प्रश्न पाटपाण्याचे नियोजन नाही. मुळा धरणाचे पाणी बीडला देण्याचे नियोजन चालले आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफीचा किती फायदा झाला. शासनाने २०१६ ला कर्ज माफी जाहीर केली पण प्रत्यक्षात कर्ज माफी २०१८ साली दिली. मग शेतकऱ्यांना दोन वर्षाच व्याज भरावे लागले, यात शेतकऱ्यांचा नुकसानच झाले.

मी शासनाच्या विरोधात नाही पण काही निर्णय चुकीचे आहेत. ते सांगितलेच पाहिजे. मुळात मतदारांना जागृत केले पाहिजे. शासनाचे काम लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे व विरोधकांनी शासनावर त्रुटी किंवा शासनाचे चुकीचे निर्णय या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

सत्तेत येताना न खाऊंगा और न खाने दूंगा असे म्हणणाऱ्या पक्षाने सगळे खाणारेच पुढारी पक्षात घेतले, मग पक्ष शिस्त कुठे गेली? मी कोणत्याही पक्षाचा बांधील नसुन जे मला योग्य वाटेल त्या उमेदवाराचा मी प्रचार करीन, असे सांगून माझी भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment