कर्जत :- जामखेड विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पराभव केला. गेल्या २५ वर्षपासूनचा भाजपचा बाल्लेकिल्ला ढासळा आहे त्यामुळे पराभवाची कारणमीमांसा शोधू, अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट शिंदे यांनी केली आहे.

“हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका, नव्या जोमाने कामाला लागू, अनेक पराभव मी पाहिले, पचवले आहेत. एक पराभव हा अल्प विराम असतो तो पूर्ण विराम ठरणार नाही, पुन्हा नव्याने झेप घेऊ, असा आशावाद व्यक्त करत थांबणे मला मान्य नाही” असे म्हणत शिंदे यांनी फेसबुकच्या पोस्टव्दारे कार्यकर्त्यांना धीर दिला आहे.

तसेच “आपण सर्व नेहमीच माझ्या वाटचालीत सोबत होतात,आणि मला खात्री आहे पुढे हि साथ कायम ठेवलं,या नंतर सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला माझ्या मदतीची,सहयोगाची गरज पडले,तेव्हा तेव्हा मी तेवढ्याच ताकतीने उभा राहिलं हा माझा शब्द आहे,माझे सामर्थ्य,माझी निष्ठा आणि प्रेरणा तुम्हीच आहात,चला तर मग,,,थांबणे मला मान्य नाही” असा भावनिक संदेश राम शिंदे यांनी फेसबुकव्दारे कार्यकर्त्यांना दिला आहे.
- Share Market गुंतवणूकदारांची चांदी होणार ! एका शेअरवर थेट 40 रुपयांचा डिव्हीडंड देणार ‘ही’ कंपनी
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना हे 3 स्टॉक बनवणार मालामाल ! मिळणार 53 टक्क्यांपर्यंत रिटर्न
- नोकरीचं टेन्शनचं राहणार नाही ! पोस्टाच्या ‘या’ योजनेतून दरमहा 61,000 रुपयांची कमाई होणार ! कशी आहे योजना ?
- ब्रेकिंग ! शिर्डीसह राज्यातील ‘या’ 17 नगरपालिकांवर आता SC कॅटेगिरीमधील महिला होणार नगराध्यक्ष, वाचा डिटेल्स
- Share Market मधील गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ महिन्यात 3 कंपन्या देणार Dividend