अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांसाठीची अधिसूचना शुक्रवारी जारी होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येतील.
उमेदवाराला किंवा त्याच्या सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सार्वजनिक सुटी व्यतिरिक्त सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर आहे.

आचारसंहिता कालावधीत सण व उत्सव आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे. बंदोबस्तासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास अगोदरच कळवा,
अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मेहता यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरण्याची अंतिम मुदत – ४ ऑक्टोबर अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर अर्ज माघार – ७ ऑक्टोबर मतदान – २१ ऑक्टोबर मतमोजणी – २४ ऑक्टोबर.
- द ग्रेट खली अहिल्यानगरमध्ये येणार ! महायुतीचे शक्तीप्रदर्शन… डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे शक्तीप्रदर्शन
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांची होणार चांदी ! ‘हे’ 3 शेअर्स देतील बंपर रिटर्न
- लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याबाबत आज होणार अंतिम फैसला ! काँग्रेसच्या पत्राची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी ! शाळांना सलग 5 दिवस सुट्टी, कारण….
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता संदर्भात महत्वाचा शासन निर्णय !













