मुंबई : वाशीमध्ये तरूणावर गॅंगरेपचा प्रकार घडला आहे. परवा संध्याकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. तरूण सागर विहार येथे रस्त्यावर चालत असताना पाच जणांनी त्याला जबरदस्ती झाडीत घेवून गेले. त्यांच्यावर गॅंगरेप करण्यात आला. यावेळी त्याला मारहाण करून तोंड बंद करण्यात आले होते.
रेप केल्यानंतर पीडित तरूणाच्या पार्श्वभागात नारळाची कवटी, कापड जबरदस्ती टाकण्यात आले आहे. दरम्यान गॅंगरेप करणारे आरोपी फरार झाले असून नशा करनारे गर्दुल्ले असण्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणावर कोपरखैरणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांनी ऑपरेशन करून कपडा, नारळाची कवटी बाहेर काढले आहे. वाशी मिनी सिशोर परिसर हा वाशी खाडीला लागून आहे. या ठिकाणी मोठ्या मॅंग्रोजची झाडी आहे. मनपाकडून याच्या लगत जॉगिंग ट्रॅक बनविला असल्याने येथे लोकांची वर्दळ असते.
आजूबाजूला काॅलेजचा परिसर असल्याने दिवसा येथे प्रेमियुगलांची गर्दी मोठ्या संख्येने असते. तरूणाबरोबर घडलेला हा प्रकार संध्याकाळी 7.30 वाजता असल्याने आश्चर्य वाटते.
कारण येथे संध्याकाळी महिला वाॅकिंगसाठी येत असल्याने कदाचित नशा करून सावज शोधणाऱ्यांच्या हाताला महिला लागली नसल्याने त्यांनी तरूणाला आपली शिकार बनविले, असल्याची शक्यता आहे. गर्दुल्ल्यांना येथील झाडीझुडपातील ठिकाणं माहित असल्याने त्यांनी फुटपाथवरून जाणाऱ्या तरूणाला पाच आरोपींनी जबरदस्ती झाडीत नेले.
तिथे त्याला मारहाण करीत, तोंडावर पट्टी लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर त्याच्या पार्श्वभागात नारळाची कवटी, कपडा कोंबून पळ काढला. जखमी आवस्थेत पीडित तरूण तसाच आपल्या बाईकवरून कोपरखैरणे येथील रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर वेळेत उपचार झाल्याने जीव वाचला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- Jio Finance Share Price : मुकेश अंबानी यांच्या कंपनीचे शेअर घ्या आणि श्रीमंत व्हा !
- खासदार निलेश लंकेंच्या तालुक्यात येणार श्रीलंकेचा मुथय्या ! एमआयडीसीत साकारणार सर्वात मोठा प्रकल्प
- मुथय्या मुरलीधरन करणार अहिल्यानगरमध्ये 1635 कोटींची गुंतवणूक !
- पॅन कार्डमध्ये मोठा बदल ! लॉन्च झाले नवे पॅनकार्ड… काय बदलणार?
- MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा