राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना डेंग्यू

Published on -

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे प्रमुख नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत: ही माहिती दिली.

पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरातील मृत आणि पीडित कुटुंबाविषयी सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

डेंग्यूचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रणासाठी मी व माझी टिम पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ऐन प्रचाराच्या धामधुमीत सगळ्यांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. मात्र डासांचा उच्छाद अखेर भोवला मला डेंग्यूची लागण झाली असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News