राजीनाम्यानंतर अजित पवार कर्जतच्या अंबालीका साखर कारखान्यावर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- माजी उपमुख्यमंत्री व शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकारणात खळबऴ माजली आहे.

अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर अजित पवार यांचा मोबाईलही बंद आहे.

दरम्यान अजित पवार नगरमधील कर्जत तालुक्यातील त्यांच्या अंबालीका साखर कारखान्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ते नेमके तेथे कोणत्या कारणासाठी गेले याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (29 सप्टेंबर) रात्री उशिराने अजित पवार नगरमधील अंबालिका कारखान्यावर दाखल झाले. त्यांच्या कारखान्यावरील मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

अजित पवार यांच्यासोबत कारखान्यात वीरधवल जगदाळे असल्याची माहिती मिळत आहे. जगदाळे हे पवार यांचे भागीदार आहेत.

दरम्यान अजित पवार राजकारणातून संन्यास घेणार का हा प्रश्नही चवीने चघळला जात आहे. याला कारणही तसेच आहे. पवारांनी पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानाने या चर्चांना बळ मिळत आहे.

चिरंजीवाने राजकारणात येवू नये. आपण शेती किंवा एखादा व्यवसाय करावा असा सल्ला अजित पवार यांनी पार्थ पवारांना दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

वारांच्या या विधानाने अजित पवार हे राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार तर करत नाहीये ना, या राजकीय चर्चा जोर धरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment