अखेर बालयोद्ध्यानं करोना चक्रव्यूह भेदलं…!

Ahmednagarlive24
Published:

रायगडमधील उरण तालुक्यातील जासई येथे आई सुजादेवी आणि वडील गोविंद कुमार यांच्याबरोबर राहणारं अवघ्या 18 महिन्यांचं बाळ, नाव अम्रित गोविंद कुमार निषाद. दि. 12 एप्रिल रोजी या बाळाला ताप आल्याचं निमित्त झालं.

आई-वडिलांनी जासईतल्या संजीवनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी बाळाला तपासून दि.13 एप्रिल रोजी उरणच्या ग्रामीण रुग्णालयाला पाठविले. येथील शासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली, बाळाला तपासल्यानंतर त्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून त्याच दिवशी कामोठे येथील एमजीएम इस्पितळात दाखल केले.

सातव्या दिवशी म्हणजेच दि.20 एप्रिलला हे बाळ कोविड-19 च्या चाचणीत पॉझिटिव्ह आले. आरोग्य यंत्रणेने या बाळावर सात दिवस आवश्यक ते उपचार केले आणि सोमवार,दि.27 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी सहा वाजता अम्रित गोविंद कुमार निषाद, वय 18 महिने याला इस्पितळातून घरी सोडण्यात आले.

पहिल्या दिवसापासूनच रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि त्यांचे सहकारी, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख आणि त्यांचे सहकारी, एमजीएम हॉस्पिटलची संपूर्ण टीम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे,

पनवेल कोविड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.यमपल्ले आणि त्यांचे सहकारी, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे या सर्वांनी या बाळाला बरे करण्यासाठी प्रशासकीय, वैद्यकीय अशा सर्वच प्रकारचे शर्थीचे प्रयत्न केले होते.

आज या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले अन् हा बालयोद्धा करोना नामक महाभयंकर चक्रव्यूह भेदून यशस्वीपणे परत आला. त्याचं, त्याच्या आई-वडिलांचं सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन तर केलंच परंतु या बालयोद्ध्याने जगालाही संदेश दिला..

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment