कल्याण : कल्याण पूर्व आणि पश्चिम विधानसभेत शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात बंडखोरीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यापैकी कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने कल्याणमध्ये शिवसेना भाजपाची बंडखोरी कायम राहिली आहे.
तर सेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांनी पूर्वेतून माघार घेतली नाही म्हणून आपण माघार घेतली नसल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.

कल्याण पश्चिम येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात माघार घेण्यासाठी नरेंद्र पवार यांनी हजेरी लावली मात्र पक्ष श्रेष्टींशी बोलून आपण कल्याण पूर्वेतील सेना बंडखोर धनंजय बोडरे यांच्या माघार घेण्याच्या बातमीची वाट बघत होतो. त्यांनी माघार घेतली नाही म्हणून भाजपचे कल्याण पूर्वतील उमेदवार विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनाही धोक्यात ठेवले.
म्हणून कल्याण पश्चिमची जागा आपण अपक्ष म्हणून लढवीत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पवारांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांपर्यंत पवारांच्या या पॉवरफुल खेळीची चर्चा रंगली आहे.
यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेने भाजपला बंडखोरी करत असच संपवलेलं आहे, बंडखोरी रोखण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला नाही असा सनसनाटी आरोप केला तसेच आमदार नरेंद्र पवार शेवटच्या क्षणा पर्यंत निवडणूक कार्यलयात होते.
कल्याण पूर्व मधील शिवसेना बंडखोराने माघार न घेतल्याने आम्हाला अर्ज कायम ठेवावा लागल्याची प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली.
कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे धनंजय बोराडे यांनी बंडखोरी करत महायुतीचे भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उडी घेतली तर पश्चिमेत देखील युतीकडून शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनि बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज दोन्ही बंडखोर उमेदवारी अर्ज घेतली अशी शक्यता होती मात्र दोघानीही निवडणूक लढवण्याचा भूमिकेवर ठाम आहेत.
- भारतात आढळतो किंग कोब्रापेक्षाही विषारी साप ! ‘या’ सापाच्या दंशाने व्यक्ती वाचली तरी पॅरालिसीस होऊ शकतो
- पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विमानतळासारखे भव्य बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर
- इंजिनिअर बनायचंय ? मग सिव्हिल, मेकॅनिकल सोडा ‘या’ ब्रांचमधून इंजिनिअरिंग करा, लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीं मिळणार
- पुण्यातील दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा नवा मार्ग तयार होणार ! ‘या’ भागात विकसित होणार 20 किलोमीटर लांबीचा बोगदा