भाजपच्या उमेदवारांची नावं निश्चित,पहिली यादी आज जाहीर होणार !

Published on -

नवी दिल्ली : नवी दिल्लीत मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली असून, या बैठकीत भाजपच्या उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे.

तसंच भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात युतीची घोषणा होईल असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सांगितलेले युतीचे अनेक मुहूर्त टळले आहेत. मात्र युतीची घोषणा काही झाली नाही.

आता शिवसेनेनं जवळपास 14 उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत तर भाजपची यादी जाहीर होताच तासाभरात उमेदवरांना एबी फॉर्म वाटले जाणार आहेत. भाजपनं विभागनिहाय संघटन मंत्र्यांकडे एबी फॉर्म सुपूर्द केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

युतीच्या घोषणेआधी शिवसेनेनं संभाव्य यादी जाहीर करत एबी फॉर्म वाटल्यानंतर, आता कुठल्याही क्षणी भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे. तसंच यादी जाहीर होताच एका तासात उमेदवाराला एबी फॉर्म वाटले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News