जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरुणाला उडवले; संतप्त जमावाकडून सावंतांच्या गाडीची तोडफोड

Published on -

सोलापूर :- जलसंधारण मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे.

भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर एकच गर्दी पाहायला मिळत आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.

श्याम होळे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृत तरुण हा बार्शीतील शेलगाव होळे गावातील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांकडू देण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जमावाकडून करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे कोणाला अपघाताबद्दल समजू नये यासाठी तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून गाडीची नंबर प्लेट काढून ठेवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून श्यामचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा तपास करत आहेत.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe