मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज सायंकाळी ७ वाजता महालक्ष्मीच्या लाला लजपतराय कॉलेजमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. त्यामुळे शिवसेना त्यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हती.
मात्र, मुंबईतील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असणाऱ्या सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वरळीचा बालेकिल्ला आणखी भक्कम झाला आहे. त्यामुळे वरळीतून आदित्य यांना निवडणुकीच्या रिंगणातून उतरवण्यास कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या अनेक भागांमध्ये फिरले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी चांगलीच वातावरणनिर्मिती करण्यात सेनेला यश आले होते. मात्र, आता शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास आदित्य यांना वरळीत कितपत आव्हान निर्माण होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार
- Traffic Rules 2025 : रस्त्यावरून गाडी चालवताना हे आठ नियम लक्षात ठेवा ! नाहीतर भरावा लागेल १० हजारांचा दंड…
- शिर्डी साई मंदिरातील समाधीवर जमा होणाऱ्या पैशांचा वाद ! आमदार जगताप म्हणाले ते लोक पैसे घरी घेऊन जातात…