साहेबांच्या आदेशाला झुगारणाऱ्या आ. जगताप यांच्या विरोधात पवार कधी का बोलले नाही ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- मी आज सकाळी दिलेल्या राजीनामा काहींच्या जिव्हारी लागला आहे. त्या अस्वस्थतेतूनच त्यांनी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष यांच्यावर दबाव आणून आता मी राष्ट्रवादी युवकचा पदाधिकारीच नव्हतो, असा खोटा कांगावा सुरु केला आहे, असा आरोप किरण काळे यांनी केला आहे.

मेहबूब शेख यांची मध्यंतरी पक्षाने युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. त्यावेळी आधीची कार्यकारिणी ही विसर्जित अथवा बरखास्त केली नाही. आत्ता पर्यंत प्रदेशाध्यक्ष झाल्या पासून शेख यांनी दोन वेळा काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नवीन नियुक्त्या करताना देखील त्यांनी जुनी कार्यकारिणी बरखास्त / विसर्जित केल्याचे म्हटलेले नाही.

स्वतः कपिल पवार यांना देखील शेख यांनी नियुक्ती पत्र दिलेले नाही. जुनी कार्यकारिणी बरखास्तच केली नसल्याने त्यांचे ही पद माझ्या पदा प्रमाणेच आजही कायम आहे, हे पवार विसरले कसे ?

पक्षाचा पदाधिकारी असल्यानेच आजवर आपल्याला पक्षाच्या मुंबई आणि जिल्ह्यातील सर्व बैठकांचे निरोप नेहमी येत होते. शेख यांच्या नियुक्ती नंतर मुंबईत झालेल्या पहिल्या बैठकीत देखील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जुनी कार्यकारिणी बरखास्त केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता.

मी राजीनामा दिला असल्यामुळे मला आता या चर्चेत कोणताही रस नाही. परंतु युवक जिल्हाध्यक्षांनी दबावाखाली येत केलेला खुलासा निश्चितच हास्यास्पद आहे.

शरद पवार साहेबांच्या आदेशाला झुगारणाऱ्या आ. जगताप यांच्या विरोधात पवार कधी का बोलले नाही ?
शरद पवार साहेब यांनी मनपात इतर पक्षाशी आघाडी करू नका असा स्पष्ट आदेश आ. जगताप यांना दिला होता. त्यांनी तो पायदळी तुडविला. त्यावेळी मी पक्षाची भूमिका मांडली. त्यावेळी कपिल पवार कुठे होते ? तेव्हा लपून बसणाऱ्या पवार यांनी माझ्या पदाबाबत खोटा खुलासा करण्यासाठी तत्परता दाखवली. अशा लोकांमुळेच आज जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाताहात झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment