संगमनेर :- प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड आदी मान्यवर उपस्थित होते.
युतीमध्ये ताळमेळ नसून संशयास्पद वातावरण असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पाच वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेला पीक विम्यासाठी आंदोलन करावं लागलं. शिवसेना-भाजप एकत्र लढले तरी त्यांच्यात आलबेल नसल्याचं स्पष्टपणे दिसत असल्याचा टोला थोरातांनी लगवला.
सोमवारी आपल्या निवासस्थानाहून प्रांतकार्यालयात पायी जात बाळासाहेब थोरातांनी अर्ज दाखल केला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब थोरात यांनी शक्ती प्रदर्शन केलं.
जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित असल्याचं थोरात यांनी सांगितलं. तर आघाडीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात येणार असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार