राधाकृष्ण विखेंविरोधात आ. डॉ.सुधीर तांबे निवडणूक लढविणार

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी : राहाता विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार आमच्या कुटुंबातील असेल, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात आमदार सुधीर तांबे उभे राहणार असल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले. सुधीर तांबे हे सत्यजीत तांबे यांचे वडील आणि बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत.

सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान मुलगा सुजय यांना काँग्रेसकडून अहमदनगरमधून उमेदवारी न मिळाल्याने, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला.

आता विधानसभा निवडणुकीला त्यांच्याविरोधात उमेदवार कोण असा प्रश्न काँग्रेससमोर होता. सुरुवातीला सत्यजीत तांबे, त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांची नावं चर्चेत होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment