विधानसभेसाठी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा !

Published on -

मुंबई: भाजप आणि शिवसेनेने एक संयुक्त पत्रक काढून अखेर आज युतीची घोषणा केली आहे. या पत्रकात भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष हे महायुती म्हणून लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे

फॉर्म्युल्याविषयीचा तपशील हा लवकरच जाहीर करण्यात येईल असं या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे जरी युती झाली असली तरी भाजप-शिवसेनेचा फॉर्म्युला हा गुलदस्त्याच ठेवण्यात आला आहे .

या पत्रकावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देशमुख यांची सही आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्ष विधानसभेत एकत्रितरित्या निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

दरम्यान चंद्रकांत पाटलांनी असंही म्हटलं की, ‘शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत काहीही ठरलेलं नाही.’ युतीचा फॉर्म्युला आणि उपमुख्यमंत्रीपद याबाबत शेवटपर्यंत दोन्ही पक्षांकडून बरीच गुप्तता पाळण्यात येत आहे.   

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News