अंधश्रद्धेतून पुतण्यानेच केली ‘त्या’ पुजाऱ्याची हत्या !

Published on -

जामखेड :- तालुक्यातील खर्डा येथील शिकारेवस्तीवरील दत्त मंदिरातील कुशाबा तुळशीराम शिकारे ( वय ५० ) या पुजाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या त्यांच्याच चुलत पुतण्याने केल्याचे निष्पन्न झाले.

मृताची पत्नी रेखा शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर सोपान शिकारे विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्या-मुंबईहून येणाऱ्या भाविकांचा आजार महाराज बरा करतात, परंतु आपला आजार वाढत चालला आहे, असे शंकरला वाटत असे.

तुझे आजोबा करणी करत होते, हे सगळीकडे सांगितल्याने आपली बदनामी झाली, असे वाटून त्याने महाराजांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

घटनेनंतर त्याने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपी शंकरच्या घराचा माग काढला. पोलिस पोहोचले तेव्हा आरोपी डाव्या हाताची नस कापून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रविवारी त्याला जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. सध्या पुणे येथील ससून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe