मुंबई :- मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामुळे राज्यात सत्तास्थापनेला उशीर होताना दिसत आहे. यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘ब्रेकिंग न्यूज… सत्ता स्थापण्यासाठी भाजपाला ईडीचा पाठिंबा,’ असं उपहासात्मक ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ईडीमुळं महाराष्ट्राचं अवघं राजकारण ढवळून निघालं होतं. यावरून विरोधकांनी भाजपवर ते ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप केला होता.
सचिन सावंत यांचं ट्विट –
ब्रेकिंग न्यूज –
खात्रीलायक सूत्रांची माहिती, सत्तास्थापनेसाठी भाजपाला ईडी देणार पाठिंबा!
निवडणूक निकालात राज्यात भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने विरोधकांनी आता पुन्हा हाच मुद्दा धरून भाजपवर टीका केली आहे.
निवडणुकीच्या आधी जशी ईडीची कारवाई झाली, तशीच आता सत्तास्थापनेसाठीही भाजपकडून होणार असल्याची टीका सचिन सावंत यांनी केलीय.
- वाईट काळ भूतकाळात जमा होईल ! 5 मार्चपासून ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, नशीब तुमच्या पाठीशी
- Home Loan घेण्यासाठी सध्याचा काळ फायद्याचा आहे का ? एक्सपर्ट म्हणतात, RBI……
- एसबीआयची 24 महिन्यांची FD योजना गुंतवणूकदारांमध्ये बनली लोकप्रिय ! 4 लाखाची गुंतवणुक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, मार्चअखेरीस ‘हा’ Metro मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार, तिकीट दर कसे असणार ? पहा….
- राजकीय आणि प्रशासकीय समीकरणे बदलणार ? अहिल्यानगरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत उत्सुकता