पतीच्या मित्रांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

Ahmednagarlive24
Published:

मध्य प्रदेश :- दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पार्टीसाठी आलेल्या पतीच्या मित्रांनी 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

एवढेच नाही तर नराधमांनी मित्राची म्हणजेच पीडितेच्या पतीची गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात केली.

मानवतेला काळिमा फासणारी ही घटना मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आलमपूर गावात घडली.

मिळालेली माहिती अशी की, विवाहितेवर तिच्या पतीच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पतीने मित्रांना घरी पार्टीसाठी बोलावले होते.

दारू प्यायल्यानंतर आरोपी सुनील कुशवाहा आणि मनोज अहिरवार यांनी विविहितेला महिलेला घराच्या मागच्या बाजून ओढले.

तिला वाचवण्यासाठी पती धावून आला. मात्र, दोघांनी त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना बुधवारी अटक केली आहे. त्यांच्यावर हत्या आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment