मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत चार दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस तसेच २४ ऑक्टोबर रोजी एक दिवस अशा एकूण चार दिवसांसाठी मुंबई शहरात सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी असेल त्यामुळे सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली असून आता अर्जांची छाननी सुरु आहे. उद्या ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर एकदा उमेदवारी निश्चित झाली की दोन दिवसांत प्रचाराचे नारळ फुटतील आणि राज्यात प्रचाराला वेग येईल. दरम्यान, राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
- खाते रिकामे असतानाही UPI पेमेंट शक्य! UPI च्या नव्या फीचरमुळे युजर्सना काय होणार फायदा?
- शासनाचा दणका! ६८ हजार रेशन कार्डधारकांचा लाभ बंद, तुमचं नाव यादीत आहे का?
- नवीन आधार अॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य
- आयुष्मान भारत योजनेत वर्षभरात किती वेळा घेता येतात उपचार? जाणून घ्या सविस्तर नियम
- FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा ! १ फेब्रुवारी २०२६ पासून कार FASTag वर KYV पडताळणी रद्द













