मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीचं मोठं आव्हान आहे. त्यासोबतच त्यांची पक्षांतर करण्याची भूमिकाही लोकांना पटवून द्यावी लागणार आहे.

‘काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही नरेंद्र पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. आता मात्र तुम्ही दोघे एकत्र दिसत आहात,’ असं म्हणत एका पत्रकाराने उदयनराजेंना पक्षांतराविषयी प्रश्न विचारला.
या प्रश्नावर उत्तर देताना उदयनराजे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ‘मी कोणत्या पदासाठी पक्ष सोडला नाही तर साताऱ्याच्या विकासासाठी आणि लोकांसाठी पक्ष सोडला आहे,’ असं उदयनराजे म्हणाले.
- कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…IPL 2025 आधीच MS Dhoni चर्चेत
- लाडक्या बहिणींसाठी अखेर ती गुड न्यूज आलीच, ‘या’ तारखेला दोन महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यात येणार, 3,000 की 4,200?
- Big Breaking ! ग्रामसभेतून सरपंचासह विखे समर्थकांनी काढला प्रळ ! ग्रामसभेत बहुमताने…
- 400Km मायलेज, 360-डिग्री कॅमेरा आणि AI सपोर्ट – Hyundai Venue EV बद्दल हे तुम्हाला माहीत आहे का
- Volvo ES90 EV : 700 किमी रेंजसोबत BMW आणि Mercedes ला टक्कर देणारी इलेक्ट्रिक सेडान आली !