अहमदनगर :- उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहता यांचा विवाह 8 व 9 मार्च 2019 रोजी होणार आहे. या लग्नाचे सर्व विधी मुंबई स्थित अंबानी निवास एंटिलिया हाऊसमध्ये होणार आहे.
या भव्य विवाह समांरभात अहमदनगरचे प्रसिद्ध बासरीवादक व संगीत दिग्दर्शक जितेंद्र रोकडे बासरीवादन करणार आहेत.
ते दिल्लीमधील सुभाष ठाकूर यांची ‘पूनम फ्ल्युट’ वाजवतात देशातील काही निवडक संगीतकार या भव्य विवाह सोहळ्यात आपली कला सादर करणार आहेत.
श्री.जितेंद्र रोकडे पण त्यामध्ये सहभागी आहेत. जगविख्यात प्रसिद्ध बासरीवादक पारसनाथजी यांनी बसविलेल्या ‘पारसनाथ फ्ल्युट सिंफनी’ हा कार्यक्रम होणार आहे.
त्यामध्ये पारसनाथजी स्वत: बासरी वादन करणार आहेत. संगीतकार शिव-हरि यांच्या संगीतावर आधारित काही निवडक गाण्यांचे सादरीकरण होईल. सादरीकरणाची फायनल रिहर्सल 5 मार्च रोजी होईल.
विवाह समारंभाच्या दोन्ही दिवशी सादरीकरण होणार आहे. पहिल्या दिवशीचा कार्यक्रम अंबानी परिवाराच्या जवळच्या व्यक्तींसाठी होईल.
आणि दुसर्या दिवशी 9 मार्च रोजी विवाह समारंभात आमंत्रित देश-विदेश आणि फिल्म कलकार, राजकीय, सामाजिक तसेच उद्योग क्षेत्रातील सर्व पाहुण्यांसाठी कार्यक्रम सादर करतील.