मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवार, ४ नोव्हेंबरला दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतरच पुढच्या घडामोडींना वेग येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी दिली आहे.
अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने दिलेली १० हजार कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून २५ हजार कोटींची मदत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना देण्यात यावी व संपूर्ण पीककर्ज माफ करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शनिवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर बैठकीची माहिती देताना अजित पवार बोलत होते. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.
- फक्त 1400 रुपयांची बचत आणि थेट मिळतील 25 लाख! पहा LIC ची धमाकेदार योजना
- नोकरी संपली तरी पैसा थांबणार नाही! पहा LIC ची जबरदस्त योजना…होईल फायदा
- तुम्हीही UPI वापरता? मग ही बातमी शेवटपर्यंत वाचाच
- जानेवारीत बँकेत जाणार असाल तर थांबा! अगोदर पहा बँकेला असलेल्या सुट्ट्यांची यादी
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, आता महिलांना …..