मुंबई : देशात बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक कंपन्यांतून कामगारांना मुक्त करण्याचे आदेश दिले जात आहेत. सत्ता हातात असताना रोजगार वाढवण्याचे काम करण्याऐवजी केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी भाजपा सरकारवर केली.
नवी मुंबईतील सीवूड्स येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांनाही लक्ष्य केले.
पवार म्हणाले की, संबंध देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर लागले आहे. इथे वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. सत्ता नसताना अडचणी आल्या, तर त्या दूर करण्याची हिंमत लागते, असा टोला त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला.
आज १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात यासाठी गप्प बसायचे का? त्यांची चेष्टा करण्याचे काम आताचे सरकार करत आहे. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली, त्यांच्या पंगतीत बसण्यामागे या नेत्यांचा काय दृष्टिकोन असावा? असा खोचक सवाल पवार यांनी केला.
- दिल्लीत विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देऊ – केजरीवाल मेट्रोत ५० टक्के सूट देण्यासाठी मोदींना लिहिले पत्र
- जमावाच्या हल्ल्यात सख्ख्या भावांचा मृत्यू पोलिसांकडून सहा संशयित ताब्यात
- मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भू-सर्वेक्षणाचे आदेश ! नाशिक जिल्ह्यातील २१ गावांमध्ये सुरू होणार प्रक्रिया
- बांगलादेशने लादले १० टक्के आयात शुल्क लासलगावी लाल कांदा घसरला
- गुड न्यूज ! दोन नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा, मुंबई आणि पुणेसाठी…