महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या!

Ahmednagarlive24
Published:

सांगली : कडकनाथ घोटाळा प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा, पुरग्रस्त, दुष्काळग्रस्तांना योग्य तो न्याय द्यावा, अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकून आंदोलन केले.

यावेळी भाजप सरकारचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना खासगी सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करत मार्गातून बाजूला केले. यात चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडकनाथ घोटाळा प्रकरणी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता. त्यानंतर पोलीसही कार्यकर्त्यांच्या मागावर होते; मात्र त्यांना चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पलूस-ताकारी मार्गावर एका शेतात बसून, अचानक मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर केलेल्या या गनीमी आंदोलनामुळे सर्वत्र खळबळ उडाली.

दरम्यान मुख्यमंर्त्यांनी सांगलीतील सभेमध्ये कडकनाथ प्रकरणाला बगल देत, केवळ दुष्काळी भागाला पाणी देवू, असे आश्वासन दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment